Bribe

बुधवारी दुपारी लासलगावचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेताना रा. श्रीरामपूर या महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल लोढा , रा.जामनेर, सुनील कोचर रि.सिल्लोड, जि.औरंगाबाद या यांच्यावर देखील लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लासलगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबियांवर बाल विवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या मागणी करण्यात आलेल्या खंडणी तील ५० हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथे एका लॉजवर स्वीकारताना श्रीरामपूर येथील महिलेला बुधवारी दुपारी लासलगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे भाऊ पारस ललवाणी यांचे विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदुलाल कोठारी या महिलेने जामनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६८/ २०२१ बाल विवाह प्रतिबंधक कायदा बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला होता.

    या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेने व तिच्या साथीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी ललवाणी कुटुंबियांकडून मागितली होती. सदर रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी देण्याची मागणी करण्यात आली होती.यासंदर्भात अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिली होती.

    त्यानुसार बुधवारी दुपारी लासलगावचे सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज घेताना रा. श्रीरामपूर या महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल लोढा , रा.जामनेर, सुनील कोचर रि.सिल्लोड, जि.औरंगाबाद या यांच्यावर देखील लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी लासलगाव ची निवड का करण्यात आली. याची चर्चा लासलगाव मध्ये रंगली होती.