Raid on rave party in Igatpuri; Action against 22 including 'Bigg Boss Fame' actress

रेव्हपार्टीतील २५ संशयितांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून सर्व संशयितांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेली ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळसह २५ जणांना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती पी. पी. गिरी यांनी त्यांना जामीन नाकारत ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

    नाशिक : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी जबर दणका दिला आहे. पोलिसांनी रेव्ह पार्टीसाठी वापरले गेलेले इगतपुरीतील बंगले सील केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 26 जूनच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी ‘बीग बॉस फेम’ अभिनेत्री हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांनाही अटक करण्यात आली होती.

    रेव्हपार्टीतील २५ संशयितांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून सर्व संशयितांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेली ‘बिग बॉस मराठी’ फेम मॉडेल अभिनेत्री हीना पांचाळसह २५ जणांना सोमवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती पी. पी. गिरी यांनी त्यांना जामीन नाकारत ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

    सर्व संशयित आरोपींनी अमली व मादक पदार्थ बाळगून सेवन केल्याप्रकरणी व वापराबाबत अधिक तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यात देण्यात यावे, असा युक्तिवाद सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी केला. सरकारी वकीलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने यातील तीन कामगार, एक छायाचित्रकार एक स्वयंपाकी अशा पाच जणांना जामीन मंजूर केला. तर उर्वरित एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.