नाशिकमध्ये आग लागल्याने ४ झोपड्या जळून खाक

नाशिक – नाशिकच्या फुलेनगरमधील गौडवाडी येथे आग लागल्यामुळे चार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग रविवारी दुपारी लागली होती. दैव बलवत्तर म्हणून या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही आहे. परंतु यामध्ये सुमारे अडीच लाखांचे घरांतील सामान जळल्याची माहिती अग्निशमन दलाने सांगितले आहे. 

अचानक आपल्या झोपडीला आग लागल्याची घटना समजताच रवी जाधव यांनी ही गोष्ट अग्निशमन दलाला दिली. नाशिकमधील पंचवटी अग्निशमन केंद्राचे उपअधिकारी जे.एस. आहिरे, लीडिंग फायरमन एस.जे. कानडे, फायरमन नितीन म्हस्के, संजय माळी, सिद्धार्थ भालेराव आणि इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परंतु आगीचा लोट वाढल्याने आजुबाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर हि आग विझवण्यात आली आहे.