पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील ४४ कर्मचारी कोरोनाबाधित

  • कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीपीई किट निर्मात्या कंपनीत ४४ कर्मचार्यांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना नाशिकमधील कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच कंपनीतील इतर कर्मचारी आणि आधिकाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. परंतु पीपीई किट मानव स्पशाशिवाय बनवतात का तसेच बनवलेले पीपीई किटचा प्रश्न निर्माण झाल्याने. पीपीई किटची डिलिव्हरी झालेल्या डॉक्टरांना धोका उद्भवला आहे.

नाशिक – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. परंतु संसर्ग रोखणाऱ्या पीपीई किट बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना रुग्णांनप उपचार करताना कोरोना योद्धा डॉक्टरांना जे पीपीई किट दिले जाते. ते पिपिई किट बनवणाऱ्या कंपनीतील ४४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाशिकमधील दिंडोरी पालखेड औद्यौगिक वसाहतीत पीपीई किट निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीतील ४४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कंपनी बंद ठेवण्यात आली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीपीई किट निर्मात्या कंपनीत ४४ कर्मचार्यांचा कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना नाशिकमधील कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच कंपनीतील इतर कर्मचारी आणि आधिकाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. परंतु पीपीई किट मानव स्पशाशिवाय बनवतात का तसेच बनवलेले पीपीई किटचा प्रश्न निर्माण झाल्याने. पीपीई किटची डिलिव्हरी झालेल्या डॉक्टरांना धोका उद्भवला आहे.