एसटीच्या येवला आगाराचे ७ कर्मचारी निलंबित ; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

राज्यभरातील एसटीचे आगारातील वाहक,चालक,नियंत्रक व कार्यशाळा कर्मचारी यांना मुंबईत पाठवण्यात येत आहे. यानुसार प्रत्येक आठवड्याला एसटीच्या येवला आगारातील २० चालक,२० वाहक,२ वाहतूक नियंत्रक आणि २ कार्यशाळा कर्मचारी अशा एकूण ४४ कर्मचाऱ्यांना बेस्टच्या कामगिरीवर पाठवण्यात येत आहे. गटानुसार ४४ कर्मचाऱ्यांना येवला आगाराच्या वतीने मुंबईला बेस्टच्या सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.

येवला : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी येवला आगारातील ७ कर्मचाऱ्यांना निलंबित (7 employees suspended) करण्यात आले आहे. तसेच हे कर्मचारी कामावर हजर नसल्याने ऐन दिवाळीत येवला (Yeola ) आगाराला फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने दीड लाख रुपये उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. एसटी महामंडळ व बेस्ट यांच्यात झालेल्या प्रासंगिक करारानुसार बेस्टच्या कामगिरीसाठी चालक (Driver for Best )  व वाहकाची नियुक्ती करण्यात येते यात येवला आगारातील चालक वाहकांचाही समावेश आहे. नियुक्ती होऊनही येवला आगारातील काही कर्मचारी मुंबईला गेले नाहीत तर काही जणांनी ऐन दिवाळीच्या गर्दीत येवला आगाराच्या सेवेला दांडी मारली त्यामुळे येवला आगाराच्या ७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

करारानुसार राज्यभरातील एसटीचे आगारातील वाहक,चालक,नियंत्रक व कार्यशाळा कर्मचारी यांना मुंबईत पाठवण्यात येत आहे. यानुसार प्रत्येक आठवड्याला एसटीच्या येवला आगारातील २० चालक,२० वाहक,२ वाहतूक नियंत्रक आणि २ कार्यशाळा कर्मचारी अशा एकूण ४४ कर्मचाऱ्यांना बेस्टच्या कामगिरीवर पाठवण्यात येत आहे. गटानुसार ४४ कर्मचाऱ्यांना येवला आगाराच्या वतीने मुंबईला बेस्टच्या सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र यातील तीन वाहक कामगिरीसाठी गेलेच नाहीत. तर ४ चालक येवला आगार सेवेत येणे अपेक्षित असताना त्यांनी देखील प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता गैरहजर राहिले. परिणामी ऐन दिवाळीत गर्दीच्या कालावधीत जवळपास १३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयी सोबतच येवला आगाराला दीड लाखांच्या रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहवे लागले. त्यामुळेच ३ वाहक व ४ चालक अशा एकूण ७ जणांना येवला आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे.