उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल  ; रेडियंट हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांडून तोडफोड

रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तातडीने उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच नियंत्रण कक्षाकडून अतिरिक्त पोलिस दल या ठिकाणी पाठवण्यात आले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र रेडियंट हॉस्पिटलचे डॉ.अनिकेत कड यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नाशिकरोड  : येथील रेडियंट  हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी तोडफोड  केल्याची घटना घडली आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

    याेग्य उपचार न मिळाल्याचा आराेप
    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नाशिक रोड  रेडियन्ट हॉस्पिटलमध्ये येथील शिवाजी नगर जनमतनगर जेलरोड  राहणारे पोपट दामू गोतीसे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती मध्यरात्रीच्या सुमारास अधिक खालावली त्यानंतर तातडीने रुग्णालयाकडून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. दरम्यान पोपट गोतीसे यांचे निधन झाले.मात्र नातेवाईक शाम गोतीसे व ज्ञानेश्वर गोतीसे यांनी योग्य उपचार न दिल्याचा आरोप करून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद, शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामध्ये रुग्णालयाच्या दरवाजा  व इतर सहित्य तुटले.व रुग्णालयाची काचा फोडल्याने ही काच सिस्टर लागली त्यामुळे त्या जखमी झाल्या.

    यांनी दिली तक्रार
    यावेळी रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तातडीने उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस तसेच नियंत्रण कक्षाकडून अतिरिक्त पोलिस दल या ठिकाणी पाठवण्यात आले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र रेडियंट हॉस्पिटलचे डॉ.अनिकेत कड यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.