A box containing the body of a young man found in the creek; Murder of a young man in an immoral relationship

शनिवारी (दि.२२ ) रात्री साडे अकराच्या सुमारास आमच्या बिल्डिंगमध्ये गिरीश सूर्यकांत लवटे, संदेश लवटे, रोशन लवटे, धनंजय साळुंके, कार्तिक सोनी, गजानन बावणे (सर्व रा. देवळालीगाव) हे आले. त्या सर्वांच्या हातात कोयते होते. ते चुलत भाऊ प्रशांत जाधव याला शिवीगाळ करून त्याचा शोध घेत होते. सदर प्रकार लक्षात येताच मी पोलिसांना फोन करून माहिती दिली.

    नाशिकरोड  : देवळालीगावातील जाधव मळ्यातील सुवर्ण सोसायटी येथे युवकाच्या घराखाली धारधार कोयते घेऊन जीवे मारण्याचा कट रचून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या मुलासह सहा जणांविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सागर प्रदीप जाधव (३०, हातमजूर, सुवर्ण सोसायटी, केशवलक्ष्मी अपार्टमेंट, देवळालीगाव) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या इमारतीत माझा चुलतभाऊ प्रशांत नानासाहेब जाधव (२४) हा कुटुंबा सोबत राहतो. माझे दिवंगत चुलते नानासाहेब जाधव व दिवंगत शिरीष लवटे यांच्यात पूर्वीपासून वैमनस्य होते.  २०१६ मध्ये लवटे यांच्या वाहनचालकाच्या खूनाच्या प्रकरणात माझा चुलतभाऊ प्रशांत व इतर आरोपी होते.

    १ एप्रिल २०२१ रोजी त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. पूर्वीचे वैमनस्य व त्या प्रकरणातून निर्दोष सुटल्याचा राग मनात धरून लवटे हे प्रशांत जाधव याला जीवे ठार मारण्याचा कट करत होते.  ७ मे रोजी रोशन विश्वास लवटे व त्याच्या इतर साथीदारांनी आमच्या इमारतीच्या खाली येऊन प्रशांतला आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती.

    शनिवारी (दि.२२ ) रात्री साडे अकराच्या सुमारास आमच्या बिल्डिंगमध्ये गिरीश सूर्यकांत लवटे, संदेश लवटे, रोशन लवटे, धनंजय साळुंके, कार्तिक सोनी, गजानन बावणे (सर्व रा. देवळालीगाव) हे आले. त्या सर्वांच्या हातात कोयते होते. ते चुलत भाऊ प्रशांत जाधव याला शिवीगाळ करून त्याचा शोध घेत होते. सदर प्रकार लक्षात येताच मी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता गिरीश लवटे, कार्तिक सोनी, गजानन बावणे हे निळ्या रंगाच्या आय टेन या चारचाकीतून (एमएच १२ एफएफ  ३००८) व इतर तिघेजण ॲक्टिव्हा दुचाकीवरून पळून जाऊ लागले. पोलिसांनी आय टेन गाडीचा पाठलाग करून  गिरीष लवटे, कार्तिक सोनी, गजानन बावणे यांना पकडून अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.