मुंबई-आग्रा महामार्गावरील चालत्या सियार गाडीला भीषण आग; शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra highway) निफाड (Nifad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळील साकोरे मिग फाट्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मारुती सियार गाडीला लागलेल्या आगीमुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या संजय चंद्रभान शिंदे (Sanjay Shinde)  या प्रगतशील शेतकऱ्याचा गाडीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra highway) निफाड (Nifad) तालुक्यातील पिंपळगाव बसवंत जवळील साकोरे मिग फाट्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मारुती सियार गाडीला लागलेल्या आगीमुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या संजय चंद्रभान शिंदे (Sanjay Shinde)  या प्रगतशील शेतकऱ्याचा गाडीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथून पिंपळगाव बसवंत येथे शेती कामासाठी संजय चंद्रभान शिंदे हे पिंपळगावच्या दिशेने जात असताना मारुती सियाज या गाडीने मुंबई-आग्रा महामार्गावरील साकोरे मिग फाटा येथे अचानक पेट घेतल्याने गाडी लॉक झाली. गाडीतून बाहेर पडता न आल्याने आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली; मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने गाडीमध्ये सॅनिटायझर असल्यामुळे आगीचा भडका झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.