प्रभाकर शिंदे यांचा पेढ्यांचा व्यावसाय असल्याने त्यांनी व त्यांच्या तीन मुलांनी पेढा बनवण्याचे मशिन घेण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून जमा केलेले पैसे घरता साठवून ठेवले होते. पण तेही या आगीत जळून खाक झाले आहे या आगीमुळे शिंदे यांचे मोठे नुकसान झाले असून आज हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
अहमदनगर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे एका घरात शॉर्टसर्कीट होवून घराला मोठी आग लागल्याची घटना रविवारी घडली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रभाकर शिंदे यांच्या घराला ही आग लागली. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात कोणीच नव्हते. यावेळी अचानक शॉर्टसर्कीट होवून आगीने रुद्रावतार धारण केला. त्यामुळे काही मिनीटातच घराचे पत्रे फुटून आग वर निघाली होती.
ही आग पाहून शिंदे यांचा मुलगा गौतम याने घराच्या दिशेने धाव घेतली. शेजारी असणारे देवीदास गायकवाड, संदेश गायकवाड, संगीता कजबे, महेंद्र शिंदे, मच्छिंद्र शिंदे आदिंनी ही आग वाळू व पाणी टाकून विझवली.
या आगीत शिंदे यांची रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य,मोबाईल आदि साहित्य जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे.