नाशिकमधील बाजारपेठेत दुकानाला भीषण आग, अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

नाशिक शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या एमजी रोड वरील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटर दुकानाला आग लागली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

    नाशिक : नाशिकमधील भर बाजारपेठेत एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग नाशिक शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या एमजी रोड वरील राहुल ट्रेडर्स या कॉम्प्युटर दुकानाला लागली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

    पावसाची संततधार असल्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली असून आग विझवताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट दूरवर पसरले आहेत. तसेच येथील परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली. याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.