‘मॅग्नेट मॅन’ची जाेरदार चर्चा ; घराेघर सुरू झाले ‘प्रयाेग’

जुने सिडको येथील जेष्ठ नागरिक अरविंद सोनार (७२)यांच्या शरीरावर स्टीलच्या, लोखंडी वस्तू चिटकत असल्याचा प्रकार उघडकीस येत नाही तोच अंबड येथील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या नानासाहेब देवरे व त्यांचा मुलगा हिनेश(११) देवरे यांच्या देखील शरीरावर लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे दिसून आले.

  सिडको : लस घेतल्यानंतर शरीरावर स्टील, लाेखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचा प्रकार समाेर आल्यानंतर आता अनेक जण हा प्रयाेग करून पाहू लागले आहेत.आश्चर्य म्हणून अनेकांच्या अंगाला स्टीलच्या आणि लाेखंडाच्या वस्तू चिकटत असल्याचेही दिसून आले आहे.

  लस सुरक्षित
  दरम्यान, लस घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला हाेता. मात्र याला वैज्ञािनक आधार असल्याचे स्पष्ट झाल्याने लस सुरक्षित आहे, याबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

  लस न घेतलेलेही ‘मॅग्नेट’
  सिडको परिसरात घराघरांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांसह छोटे मुले देखील आपल्या अंगाला स्टील किंवा लोखंडी वस्तूंची टाकतात का हा प्रयोग करत आहे. त्यात लस न घेतलेल्यांच्याही अंगाला या वस्तू चिकटत असल्याने सिडकाे परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

  घराेघरी हाेताेय प्रयाेग
  जुने सिडको येथील जेष्ठ नागरिक अरविंद सोनार (७२)यांच्या शरीरावर स्टीलच्या, लोखंडी वस्तू चिटकत असल्याचा प्रकार उघडकीस येत नाही तोच अंबड येथील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या नानासाहेब देवरे व त्यांचा मुलगा हिनेश(११) देवरे यांच्या देखील शरीरावर लोखंडी वस्तू चिटकत असल्याचे दिसून आले. यामुळे आता अंगाला स्टील चिटकून बघण्याचा प्रयोग घरोघरी केला जात असल्याचे चित्र देखील सध्या परिसरामध्ये निर्माण झाले आहे.