दोन व्यावसायिकांवर कारवाई : कोरोना नियमांचे उल्लंघन ; १४ हजारांचा दंड वसूल

शहरातील एमजी मार्केटमधील पारस सुपर मार्केट हे दुकान निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असल्याचे आढळून आल्याने सहाय्यक आयुक्त यांचे निर्देशानुसार त्यांच्यावर रुपये ५ हजार दंड तसेच प्रत्यक्ष २ ग्राहक आढळल्याने प्रति ग्राहक हजार रुपये याप्रमाणे २ हजार असे एकूण रु. ७ हजार दंड वसूल करण्यात आला. तसेच लोढा मार्केट वैष्णवी बुटीक हे दुकान सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असल्याने ७ हजार रुपये दंडाची करवाई करण्यात आली. सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

    मालेगाव : येथील महापालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय, बाजारपेठा दुपारी २ वाजेनंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरीसुद्धा काही व्यावसायिक आपले व्यवसाय सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा व्यावसायिकांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवार दि.१ जून रोजी मनपाने शहरातील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या दोन व्यावसायिकांवर कारवाई करून १४ हजारांचा दंड वसूल केला.

    यांनी केली कारवाई
    मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या निर्देशानुसार उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या सुचनेने सहा. आयुक्त (कर) तुषार आहेर यांच्या अधिपत्याखाली प्रभाग अधिकारी हरीश डिंबर आणि पथक प्रमुख पुंडलिक ढोणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

    यांच्यावर कारवाई