कार्यकर्त्यांची धरपकड, वाहतूक काेंडी : ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचा रास्ता राेकाे

समता परिषदेचे आंदोलन सुरू हाेण्याआधीच पहाटेच्या सुमारास येथे एक गॅस टॅंकर उलटला असल्याने वाहतुकीची काेेंडी झाली हाेेती. त्यात आंदोलनाची भर पडल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला. द्वारका परिसरात आंदोलनाला सुरुवात होताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.

    नाशिक : न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मागण्यांसाठी केंद्र शासनाच्याविरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांनी आज द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

    दुहेरी काेंडी
    समता परिषदेचे आंदोलन सुरू हाेण्याआधीच पहाटेच्या सुमारास येथे एक गॅस टॅंकर उलटला असल्याने वाहतुकीची काेेंडी झाली हाेेती. त्यात आंदोलनाची भर पडल्याने वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला. द्वारका परिसरात आंदोलनाला सुरुवात होताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहचवत असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली.