राजस्थान, मुंबई, पुण्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे होणार कबुतरखाना ; व्यापा-यांच्या चर्चेनंतर लगेच भूमिपूजन

या कबूतर खान्यात तब्बल एक हजार कबुतरांचे पालन-पोषण होणार आहे. राजस्थान मुंबई-पुणे यानंतर पिंपळगाव बसवंत येथे कबूतरखाना उभा राहणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील उज्वल गो शाळेच्या वतीने हा कबुतरखाना उभारण्यात येत असून यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

  पिंपळगाव बसवंत : येथील उज्वल गो शाळेच्या वतीने कबुतरखाना उभारण्यात येत असून ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या हस्ते कबुतरखान्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कबुतरखान्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

  तासाभरात तब्बल ५० हजार रुपयांचे संकलन
  या कबूतर खान्यात तब्बल एक हजार कबुतरांचे पालन-पोषण होणार आहे. राजस्थान मुंबई-पुणे यानंतर पिंपळगाव बसवंत येथे कबूतरखाना उभा राहणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील उज्वल गो शाळेच्या वतीने हा कबुतरखाना उभारण्यात येत असून यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, शनिवारी अमावस्येच्या दिवशी कबुतरखाना उभारणीसाठी व्यापारी वर्गाने खिशात असतील तेवढे पैसे दिले. एका तासात तब्बल ५० हजार रुपयांचे संकलन झाले. येथील कांदा व्यापारी व बेदाणा व्यापारी यांच्या परिश्रमातून सुमारे चौदा वर्षापूर्वी उज्वल गोशाळेची स्थापना करण्यात आली.

  चर्चेत कल्पना; लगेच अंमलबजावणी
  दर अमावस्येला व्यापारी बांधव गोशाळेत जमतात व गोमातेला गुळ पोळी खाऊ घालतात. शनिवारी सुद्धा अमावस्या असल्याने व्यापारी बांधव गोशाळेत जमले होते. गोमातेला गुळपोळी दिल्यानंतर गोमाते बरोबरच कबुतरांचेही पालन-पोषण करावे, त्यासाठी कबुतरखाना उभारावा, याबाबत चर्चा करण्यात आली आणि लगेचच कबूतर खान्याचे भूमिपूजन करण्यात आले. येथील गोशाळेत आजही अडीचशे कबूतर आहे. त्यांचे पालनपोषण केले जाते. मात्र, आता राजस्थान मुंबई-पुणे या सारखेच कबुतरखाना उभारण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्यक्ष कामही सुरू करण्यात आले. दोन महिन्यातच हे काम पूर्ण होणार असून तब्बल एक हजार कबुतरांचे या ठिकाणी वास्तव्य राहणार आहे. यासाठी दहा फुटी गोलाकार बंदिस्त चबुतरा उभारला जाणार आहे. या प्रकारचे कबुतरखाने राजस्थानच्या गावागावात असल्याचे व्यापारी बांधवांनी सांगितले.

  कबूतर हा शाकाहारी प्राणी असून त्याच्या दाण्या पाण्याची सोय निवारा याठिकाणी आता होणार आहे. यासाठी कांदा बेदाणा व्यापारी महावीर भंडारी सुरेश पारख, अतुल शहा, चंद्रकांत राका, किशोर ठक्कर, शोभाचंद पगारिया, अल्पेश पारख, केतन पुरकर, विपुल पगारिया, शैलेश खाबिया, हितेश ठक्कर, गोलू खाबिया, योगेश वाबळे, सागर गायकवाड, दत्ता कदम, महेश कलंत्री, चेतन बोरा आदींसह व्यापारी बांधव प्रयत्नशील आहे.