One such hospital in Nashik was hit hard by social activist Jitendra Bhave

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच आराेग्यमंत्री राजेश टाेपे काेणत्याही रुग्णाकडून डिपाॅझिट घेऊ नये, असे सांगितले असताना रुग्णालयांकडून डिपाॅझिट घेतले जात असून, या माध्यमातून रुग्णांची लूट हाेत आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत रुग्णालयाने गुन्हा केला असताना पाेिलसांनी मात्र आम्हाला डांबून ठेवले.

  नाशिक : वाेक्हार्ट रुग्णालयात झालेले कपडे फाडाे आंदोलन करण्याचा आ मचा इरादा नव्हता. मात्र रुग्णालय प्रशासनाने दाद न दिल्याने आम्हाला आंदोलन करावे लागले. शासनाने वाेक्हार्ट रुग्णालयाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ता जितेंद्र भावे यांनी सांगितले.

  रुग्णालयांकडून लूट

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच आराेग्यमंत्री राजेश टाेपे काेणत्याही रुग्णाकडून डिपाॅझिट घेऊ नये, असे सांगितले असताना रुग्णालयांकडून डिपाॅझिट घेतले जात असून, या माध्यमातून रुग्णांची लूट हाेत आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत रुग्णालयाने गुन्हा केला असताना पाेिलसांनी मात्र आम्हाला डांबून ठेवले.

  भावेंना पोलिसांची समज
  यापुढे कुठल्याही रुग्णालयात जायचे असेल तर आधी पोलिसांना त्याची माहिती द्यावी आणि नंतरच असे आंदोलन करावे, अशाप्रकारची समज पोलिसांनी भावेंना दिल्याचे समजते.

  व्याजाने आणले हाेते पैसे
  दरम्यान, ज्या रुग्णाच्या पैशांसाठी भावेंनी अांदाेलन केले. त्या रुग्णाच्या कुटुंबातील चार जणांचे आधीच निधन झाले आहे. आपल्या आई-वडिलांच्या उपचारासाठी त्याने व्याजाने पैसे आणलेले हाेते. रुग्णालयाने त्याच्या आई-वडिलांना दाखल करून घेताना आधी दीड लाख भर तरच दाखल करू, असे सांगितले हाेेते. मग जाताना दीड लाख देऊनच पाठवायला हवे हाेते, असेही भावे यांनी यावेळी सांगितले.

  पोलिसांवर जनतेचा विश्वास नाही
  संबंधित रुग्णालयाने चूक केली असताना पोलिसांनी त्यांना पकडण्याऐवजी मला सात तास बसवून ठेवले. म्हणजे चाेर साेडून सन्याशाला फाशी, अशा प्रकारांमुळे आज पोलिसांनी जनतेचा विश्वास रािहलेला नाही. त्यामुळे जनता तुमच्याकडे येत नाहीत, असेही त्यांनी म्हटले.

  आराेग्य माफिया
  काही खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून आराेग्य माफिया तयार झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई हाेत नाही; त्यामुळे सरकार आणि या काॅर्पाेरेट रुग्णांची मिलीभगत आहे का? असा संशय याला जागा आहे. ऑपरेशन हॉस्पिटल हे आता राज्यभर राबवणार आहाेत, असे अाम अादमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.

  दिल्लीप्रमाणे व्यवस्था हवी
  दिल्लीत आम्ही आराेग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आहेत. तसेच बदल राज्यात हाेत नाही, ताेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  खासगी रुग्णालये आजही रुग्णांची पिळवणूक करत आहेत. सरकारचे अस्तित्व दिसत नाही. रेमेडिसिविर, प्लाझ्मा याबाबत कुठेही आर अॅण्ड डी झाल्याची कुठेही नाेंद नाही. त्यामुळे या व्यवसायात केवळ पैसा आणि पैसाच शिल्लक राहिला आहे.

  - जितेंद्र भावे, प्रदेश प्रवक्ता, आप