मराठा क्रांती माेर्चा आक्रमक; पाेलिस आयुक्तांना निवेदन

डाॅ. सदावर्तेंवर गुन्हा दाखल करून घटनेची ताकद दाखवा

नाशिक : मराठा समाज आरक्षाणाच्या मुद्यावर आक्रमक आहे मात्र काेणतीही अविचारी भूिमका घेत नसतांना कायद्याचे स्वत:ला पंडीत म्हणविणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने सामािजक सलाेखा धाेक्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घटनेची ताकद दाखवण्याची मागणी मराठा क्रांती माेर्चाने केली आहे. यासंदर्भात माेर्चाच्या पदािधकाऱ्यांनी पाेलिस आयुक्त निवेदन देण्यात आले.

डाॅ. सदावर्ते यांनी ७ अाॅक्टाेबरला एका वृत्तवािहनीवरील चर्चेदरम्यान मराठा समाजाचे श्रध्दास्थान छञपती शिवाजी संभाजी राजे यांना अफझलखानाची उपमा देऊन मराठा समाजाच्या भावनांना धक्का पोहचवला. असे वक्तव्य करून त्यांनी एकप्रकारे मराठा समाजाला चिथावण्याचे कृत्य केले असल्याने त्यांच्याविरूध्द दंगा घडवून आणण्याचे कटकारस्थान रचण्यासारख्या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने पोलीस आयुक्तांना केली आहे.

सदावर्ते यांनी एका वृत्तवािहनीवरील चर्चेदरम्यान छञपती संभाजीराजे यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे मराठा समाजात संतापाचा तीव्र उद्रेक सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असे वक्तव्य करून एकप्रकारे त्यांनी राज्यात सामािजक दंगल घडिवण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्याविरुद्ध कठाेर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती माेर्चाने सरकारवाडा पाेलिस ठाण्यात ठीय्या मांडण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, निलेश शेलार, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील यांसह विविध कार्यकर्ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकञ येऊन पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पाेलिस उपायुक्त अमोल तांबे ,सहाय्यक पाेलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पाेलिस निरिक्षक हेमंत सोमवंशी ,विजय ढमाळ यांच्याशी समन्वयकांची चर्चा झाल्यानंतर निवडक समन्वयकांनी पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांची भेट घेऊन गुन्हे दाखल करण्याचे निवेदन दिले.
या निवेदनात क्रांती मोर्चाने म्हटले आहे की, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नामुळे मराठा समाजाच्या भावना प्रक्षूब्ध झाल्या असताना मराठा समाज व इतर जातींमध्ये दूही माजवून राज्यात दंगली माजवण्याच्या व अराजक पसरवण्याच्या उद्देशाने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवरायांचे वंशज व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल अपशब्द बोलून त्यांना अफझलखान संबोधून गंभीर अपराध केलेला आहे. एका वृत्तवािहनीवरील कार्यक्रमात जाहीरपणे प्रक्षोभक विधाने करत आमच्यासह करोडो लोकांच्या भावना दुखावलेल्या अाहेत. त्याुमळे राज्यातील जातींमध्ये कलह निर्माण होवून दंगली भडकण्याची परिस्थती निर्माण झालेली असल्याने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचेविरुद्ध दंगा घडवून आणण्यासाठी बेछूटपणे चिथावणी देणे, निरनिराळ्या गटांमध्ये शत्रूत्व वाढविण्यासाठी कृती करणे, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती घराण्याची बदनामी करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान, वर्गावर्गामध्ये शत्रूत्व निर्माण करणारी विधाने केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी. यावेळी घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सरकारावाडा पाेलिस ठाणे ते पाेलिस आयुक्तालय परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.