नाशिकसह इतर जिल्ह्यातून चोरलेल्या ६ दुचाकी हस्तगत ; अंबड पोलिसांची कामगिरी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनी गणेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस शिपाई प्रमोद काशीद व योगेश शिरसाठ यांना याबाबत गाेपनीय मािहती मिळाली हाेती.

    सिडको : नाशिक शहर इतर जिल्ह्यातून चोरलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून, दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांचा सापळा
    शहरासह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी,पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सपोनी गणेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस शिपाई प्रमोद काशीद व योगेश शिरसाठ यांना याबाबत गाेपनीय मािहती मिळाली हाेती. त्यानुसार पाथर्डी फाटा ते अंबडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंडो लाईन फर्निचरच्या कंपाऊंडलगत गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, किरण गायकवाड, जनार्दन ढाकणे, मुरली जाधव, मुकेश गांगुर्डे, अनिरुद्ध येवले, मच्छिंद्र वाघचौरे, नितीन सानप, हेमंत आहेर, राकेश राऊत, प्रमोद काशीद यांच्या पथकाने सापळा रचला.

    यांना घेतले ताब्यात
    पोलीसांनी रचलेल्या सापळ्याप्रमाणे संशयित आदित्य राजेंद्र घुमरे (१९, रा. ओम साई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर १, आनंद नगर, पाथर्डी फाटा, नाशिक) व केतन गणेश भावसार ( १९, रा. स्वरांजली हॉटेल जवळ, मोंढे मळा, इंदिरानगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता अंबड पोलीस ठाण्यातील एक, इंदिरानगर पोलिस ठाण्यातील तीन, सातपूर पोलीस ठाण्यातील एक व अहमदनगर जिल्ह्यातून चोरून आणलेली व सध्या नाशिक येथे वापरत असलेली दुचाकीसह एकूण सहा दुचाकी किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.