बेटी बचावसाठी अनाेखा उपक्रम : रवींद्र व सविता पवार यांना ‘एकच मुलगी वंशाचा दिवा’ पुरस्कार

म्हातारपणी जीवाला आधार या भावनेतून ग्रामीण भागात मुलगा हाच फक्त वंशाचा दिवा, ही धारणा आजही कायम आहे. मात्र या सर्व गोष्टींचा, समाजाचा विचार न करता ‘एकच अबोली वंशाचा दिवा’ हा निर्धार करून सर्व समाजाची बोलती बंद करून ग्रामीण भागातील या शेतकरी दाम्पत्याने समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

    देवळा : मुलगा हाच वंशाचा दिवा ही धारणा हळूहळू लुप्त होत असली तरीही ग्रामीण भागात मात्र काहीही झाले तरी एक मुलगा हवाच ही धारणा आजही घर करून आहे. मात्र हीच धारणा मोडीत काढत देवळा तालुक्यातील भऊर येथील रवींद्र देवराम पवार व सविता रवींद्र पवार या शेतकरी दाम्पत्याने मुलगी हीच वंशाचा दिवा मानून कुटुंब नियोजन करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल  पवार दाम्पत्य व मुलगी अबोली पवार यांचा आनंद ऍग्रो केअर परिवाराच्या वतीने ‘एकच मुलगी वंशाचा दिवा’ हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
    मुलीचा अभिमान
    म्हातारपणी जीवाला आधार या भावनेतून ग्रामीण भागात मुलगा हाच फक्त वंशाचा दिवा, ही धारणा आजही कायम आहे. मात्र या सर्व गोष्टींचा, समाजाचा विचार न करता ‘एकच अबोली वंशाचा दिवा’ हा निर्धार करून सर्व समाजाची बोलती बंद करून ग्रामीण भागातील या शेतकरी दाम्पत्याने समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रवींद्र व सविता यांची अबोली आता बी.फार्म.सी.च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. आजची त्यांच्या या निर्णयाचा त्यांना सार्थ अभिमान असल्याचे पवार दाम्पत्य सांगते. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल केंद्रीय मंत्री. भारतीताई पवार, आमदार डॉ. राहुल आहेर भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आदर्श निर्णयाचे कौतुक केले आहे.
    यांची उपस्थिती 
    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, एन. आर. सी. ग्रप्स पुणे च्या माजी संचालिका डॉ. इंदू एस. सावंत, प्रगतिशील द्राक्षे बागायतदार सुरेश कळमकर, मनोज जाधव, आनंद ऍग्रो केअर चे संचालक घनश्याम हेमाडे, शोभा हेमाडे, राजू जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पवार कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.