अनकाई सरपंचांचा स्तुत्य उपक्रम : अतिवृष्टीने वाहून गेलेला रस्ता लोकसहभागातून केला दुरुस्त

अनकाई ग्रामपंचायत सदस्य अलकेश कासलीवाल यांनी पावसामुळे रस्त्याची झालेली वाताहात पाहून लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीची कल्पना सरपंचासह ग्रामस्थांसमोर मांडली अन‌् रस्ता दुरुस्तीचा निर्णय झाला. अनकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे ५० ते ६० कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता.

    येवला :  नागरिकांना ये-जा करण्याच्या दृष्टिकोनातून अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय अनकाईच्या सरपंच नगीना कासलीवाल यांनी घेतला अन‌ ग्रामस्थांनीही उस्फुर्त प्रतिसाद देत एकाच दिवसांत रस्त्याची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी मोकळाही करून दिला.

    गावाशी संपर्क तुटला
    अनकाई ग्रामपंचायत सदस्य अलकेश कासलीवाल यांनी पावसामुळे रस्त्याची झालेली वाताहात पाहून लोकसहभागातून रस्ता दुरुस्तीची कल्पना सरपंचासह ग्रामस्थांसमोर मांडली अन‌् रस्ता दुरुस्तीचा निर्णय झाला. अनकाई ते भगतवाडी हा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे भगतवाडी येथे राहणारे ५० ते ६० कुटुंबाचा गावाशी संपर्कच तुटला होता. ग्रामस्थांनी अलकेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधून व्यथा सांगितली. शेतमाल वाहतूक करणे मजूर ने आण करणे, दुग्धव्यवसाय सगळंच ठप्प झाले हाेते. रस्त्यावर खर्च करणे आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायतच्या आवाक्याबाहेर होत.

    यांचा सहभाग
    कोरोनामुळे जिल्हा परिषद तातडीने मंजुरी देईल, अशीही शक्यता नव्हती म्हणून अनकाईच्या सरपंच नागिना कासलीवाल, उपसरपंच शिवम अहिरे, सदस्य डॉ प्रितम वैद्य, अलकेश कासलीवाल, सागर सोनवणे व संतोष टिटवे यांनी स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करुन दिला दत्तू सोनवणे, भगवान जाधव,विलास जाधव,बाळू सोनवणे, पारुबा राऊत, सागर देवकर, बाळू जाधव, नंदू जाधव,नितीन देवकर, रवींद्र जाधव आदींनी आपला ट्रॅक्टर देऊन शाम व्यापारे, किरण बडे, मारुती वैद्य, भगवान जाधव, किरण देवकर, अण्णा जाधव, शांताराम वैद्य, सचिन जाधव, शंकर चव्हाण व सर्व तरुणांनी मिळून रस्त्याचे काम पूर्ण करून प्रशासनाचे लाखो रुपये वाचवून स्वतःच्या समस्या वर स्वतःच मार्ग काढत नवीन आदर्श निर्माण केला आहे.

    यांनी केले काैतुक
    येवला तहसीलदार प्रमोद हिले, पालकमंत्री छगन भुजबळ संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड आदींनी सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांचे कौतुक करत अभिनंदन केले.