गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढवली. मात्र, त्यांना परभवाचा धक्का बसला. यानंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला. मात्र, ते शिवसेनेतही रमले नाहीत. अखेरीस त्यांनी पून्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने त्यांना महत्वाचे पद दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिक : आधी राष्ट्रवादी, मग शिवसेना असा प्रवास करत बाळासाहेब सानप शेवटी फिरुन तिथेच आले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपात घरवापसी केली आहे. यानंतर पक्षाने त्यांना दुसऱ्या क्रमांचे पद दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतले. त्यांची प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.