सुमंत माेरे यांची नियुक्ती ; ‘स्मार्ट’ सीईओ थविल यांची अखेर उचलबांगडी

३० जून रोजी थविल यांच्या बदलीची ऑर्डर अपर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले होते. सुमंत मोरे यापुढे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार पाहणार आहे. आज स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे नाशिक दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर थवील यांची बदली चर्चेचा विषय झाली आहे.

    नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओपदी आल्यापासून प्रकाश थविल नेहमीच या ना त्या कारणाने वादात रािहले. पाच वर्षांत स्मार्ट सिटीची काेणतीही कामे पूर्ण झाली नसल्याने नगरसेवकांनी विशेष महासभेत प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला हाेता. थविल यांनी महासभेला दांडी मारल्याने एकप्रकारे महासभेचा अपमानच केल्याचे सदस्यांनी म्हटले हाेते. याच बैठकीत थविल यांच्या बदलीचा प्रस्ताव संमत करण्यात आला हाेता. अखेर या सर्व घटनांची दखल घेत थविल यांना महसूल व वन विभागाकडे वर्ग करत त्यांच्या जागी सुमंत माेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासारखी बेफिकीर वृत्तीची व्यक्ती पाहिली नाही. स्मार्ट सिटी कंपनी जणू वैयक्तिक कंपनी असल्याच्या थाटात ते अतिशय वाईट पध्दतीने कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत महापौर सतीश कुलकर्णी यांनी थविल यांची तत्परतेने बदली करावी, असा ठराव मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यानंतर लागलीच थविल यांची बदली झाली.

    स्मार्ट सिटीच्या सर्वसाधारण सभेत प्रकाश थविल उपस्थित नव्हते. त्यामुळे आम्ही स्मार्ट कामांबाबतच्या तक्रारी मांडल्यानंतर त्याची उत्तरे देणारेच स्मार्टसिटी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा उल्लेख लाेकप्रतिनिधींनी केला हाेता. स्मार्टसिटीच्या नावाखाली शहर भकास केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. स्मार्ट योजनेतील कामांमुळे मध्यवर्ती परिसरात खोदकाम झाले आहे. त्याचे पडसाद मागील सभेत उमटल्यानंतर स्मार्ट योजनेतील कामांबाबत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    दरम्यान, ३० जून रोजी थविल यांच्या बदलीची ऑर्डर अपर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले होते. सुमंत मोरे यापुढे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार पाहणार आहे. आज स्मार्ट सिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे नाशिक दौऱ्यावर आहेत. यापार्श्वभूमीवर थवील यांची बदली चर्चेचा विषय झाली आहे. याआधीदेखील चार वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम आणि त्यानंतर ठेकेदाराला प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड केल्यानंतर हा दंड रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय थविल यांच्या अंगाशी आला होता. एकदा महासभेत याप्रकरणी कंपनीकडे खुलासा मागण्याचे आदेश महापोर सतीश कुलकर्णी यांनी दिले होते. गोदावरी नदीचे काँक्रिटीकरण करणे काढणे हे प्रोजेक्ट कामदेखील वादग्रस्त ठरले होते.