अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावे भुजबळांची मालमत्ता :किरीट साेमय्या

आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केला. दाभाडीतील साखर कारखाना घेतला, त्या माध्यमातूनही भुजबळांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेतला. गेल्या आठवड्यात आयकर विभागाने त्यांची १२० काेटी रूपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. यावर अजूनही भुजबळ काही बाेलत नाहीत. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर देऊन आपल्यावरील आराेपांबाबत मत मांडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केला.

    नाशिक : राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी असि्तत्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावे मुंबईत माेठी संपत्ती जमा केली असून, ते मुंबईत रहात असलेल्या नऊ मजली महालाचे मालक काेण? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शाेधून आम्हाला सांगावे, असे अाव्हान भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी दिले.

    सोमय्या यांनी बुधवारी वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले.-मुंबईत बांधलेल्या करोडो रुपयांच्या घरासाठी पैसा कुठून आणले. मुंबईत देखील मी भुजबळ यांच्या भुजबळ महालची पाहणी करायला जाणार आहे.

    आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केला. दाभाडीतील साखर कारखाना घेतला, त्या माध्यमातूनही भुजबळांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेतला. गेल्या आठवड्यात आयकर विभागाने त्यांची १२० काेटी रूपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. यावर अजूनही भुजबळ काही बाेलत नाहीत. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर देऊन आपल्यावरील आराेपांबाबत मत मांडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केला.

    छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहिर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली.या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला.आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केले असा गंभीर आरोप त्यांनी केला.भुजबळ यांच्या निघडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल,नाशिक,अंधेरी,सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली अशी माहिती त्यांनी दिली.