सावधान! दुपारी तीननंतर बाहेर पडले तर हाेणार कारवाई

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाशिक यांनी ३१ मे २०२१ नुसार ठरवून दिलेल्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा व आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना व सेवा ठरवून दिलेल्या वेळेतच सुरु राहतील. तसेच सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांना सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी अनुज्ञेय राहील. तथापि, यासाठी पूर्वी दिलेल्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

    नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भावामूळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण होवू नये, याकरिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ जून २०२१ पर्यंत कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहे. त्यानुसार नागरिकांना दु. ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

    निर्देशांचे पालन करा