महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळ दोषमुक्त; येवल्यात राष्ट्रवादी व भुजबळ समर्थकांचा जल्‍लोष

भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व भुजबळ समर्थकांनी विंचूर चौफुली येथे फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला.

    नाशिक : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

    दरम्यान आज भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व भुजबळ समर्थकांनी विंचूर चौफुली येथे फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला.