onion export

तब्बल दोन हजारांची घट होताच विक्रीने उच्चांक घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती.

    नाशिक : कांद्याच्या दरात मोठी पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दरात मोठी घसरण झाली आहे. तब्बल दोन हजारांची घट होताच विक्रीने उच्चांक घेतला आहे. दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती.

    परंतु हे चित्र सध्या बदलले असून, देशांतर्गत गुजरात, आंध्र प्रदेश, राज्यस्थान, मध्य प्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव बाजार समितीत दरात मोठी पडझड होऊ लागली आहे. लाल कांद्याची २५ हजार क्विंटल आवक होऊन दर किमान एक हजार ४५१, कमाल दोन हजार ५२, तर सरासरी एक हजार ८०१ रुपये एवढे राहिले.

    तर गावठी कांद्याच्या आवकेत घट होऊन चार हजार रुपये क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला किमान एक हजार २००, कमाल दोन हजार ४९०, सरासरी एक हजार ७५१ रुपये दर मिळाला.