भाजपा महिला आघाडीचे उद्या आंदोलन

मनपा, पोलीस आयुक्तांना देणार निवेदन

नाशिक : कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळात कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या (२२ सप्टेंबर )नाशिक मनपासमोर भाजपा महिला मोर्चातर्फे आयुक्तांना निवेदन देत आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली.

सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नाही आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे भाजपा महिला मोर्चा , महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे उद्या दि. २२ रोजी महाराष्ट्रामधील सर्व महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्समध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलन छेडणार आहे. अशी माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा उमा खापरे, उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, चिटणीस रोहीणी नायडु व हिमगौरी आडके यांनी दिली आहे.