गांधी तलावातील बोटी जाळल्या ; अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याने खळबळ 

काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरू असल्याने बोट सैर बंद आहे. गंगाघाटावर येणाऱ्या नागरिकांना नदीपात्रातील पाण्यातून सैर घडविण्यासाठी ठेकेदाराने चार बोटी खरेदी केल्या होत्या, मात्र पाणी नसल्याने सध्या सैर घडविणे बंद असल्याने ठेकेदाराने या बोटी गांधी तलावाच्या काठावर उभ्या करून ठेवल्या आहेत.

    पंचवटी : गाेदाघाटावर स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने तसेच गोदावरी नदीला वाहते पाणी नसल्याने गांधी तलावाच्या काठाला ठेकेदाराने उभ्या केलेल्या चार बोटी (होड्या) अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे.
    पंचवटी पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली; मात्र दुपारपर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी कोणीहीपुढे आले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. बोटी जाळपोळीमागे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याचा हात असल्याचे बोलले जात असून, पूर्ववैमनस्यातून या बोटी जाळल्याची चर्चा आहे. गाेदाघाटावरील रामकुंड हे धार्मिकस्थळ आहे. दैनंदिन शेकडो भाविक देवदर्शनासाठी गंगाघाटावर येतात. गांधी तलावात बोटीच्या माध्यमातून आलेल्या पर्यटकांना सैर घडविणासाठी पालिकेने ठेका दिला आहे.

    काही दिवसांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरू असल्याने बोट सैर बंद आहे. गंगाघाटावर येणाऱ्या नागरिकांना नदीपात्रातील पाण्यातून सैर घडविण्यासाठी ठेकेदाराने चार बोटी खरेदी केल्या होत्या, मात्र पाणी नसल्याने सध्या सैर घडविणे बंद असल्याने ठेकेदाराने या बोटी गांधी तलावाच्या काठावर उभ्या करून ठेवल्या आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी गांधी तलावात येऊन उभ्या चार बोटींना आग लावून त्या पेटवून दिल्या. बोटीला लाकुड आणि प्लॅस्टिक वापरलेले असल्याने काही वेळातच चार बोटी जळून खाक झाल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून केले कृत्य?ठेकेदार व काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले संशयित यांच्यात वाद असावेत व त्यातूनच वचपा काढण्यासाठीबोटी जाळल्या असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, पंचवटी पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.