येवल्यात प्रहार संघटनेतर्फे केंद्र शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन ; शेतीविषयक कायदे रद्द करण्याची मागणी

येवला : केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाचक ठरणारे तीन शेतीविषयक कायदे लागू केल्याने संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. येवल्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला.

येवला तालुक्यात येवला शहरासह ग्रामीण भागातही बंद असून विखरणी येथील दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली आहेत तर सायगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तालुक्यातील पाटोदा येथे प्रहार संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने बंद पाळण्यात आला असून पाटोदा येथे शुकशुकाट जाणवत आहे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबराव आहेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते