पोलिसांच्या नजरेसमोरून चोरटे पसार शहर परिसरातून सहा दुचाकींची चोरी करून

या प्रकरणी सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  या दुचाकी चोऱ्यांची अधिक माहिती अशी, की सतीश दिलीप वाळके (३५, रा. वृंदावननगर) यांची एमएच १५ बीएफ २४८३ या क्रमांकाची दुचाकी सुयोग हॉस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

  नाशिक: शहर परिसरातून ठिकठिकाणी सहा दुचाकींची चोरी करून चोरटे पोलिसांच्या नजरे समोरुन पसार झाले आहेत. या प्रकरणी सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, म्हसरूळ, उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  या दुचाकी चोऱ्यांची अधिक माहिती अशी, की सतीश दिलीप वाळके (३५, रा. वृंदावननगर) यांची एमएच १५ बीएफ २४८३ या क्रमांकाची दुचाकी सुयोग हॉस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शेळके अधिक तपास करीत आहेत.
  दुचाकीचोरीची दुसरी घटना नरसिंहनगरमध्ये घडली आहे. अनुप परदेशी (३०, रा. नरसिंहनगर, गंगापूर रोड) यांची एमएच १५ ईआर ८८२१ या क्रमांकाची दुचाकी सायली अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार कटारे अधिक तपास करीत आहेत.
  दुचाकीचोरीची तिसरी घटना एम. जी. रोडवर घडली आहे. रवींद्र भिकाजी निरभवणे (५२, रा. सिद्धेश्‍वरनगर, हिरावाडी, पंचवटी) यांची एमएच १५ ईजे २३४१या क्रमांकाची दुचाकी एम. जी. रोडवरील एस. एस. मोबाईल शॉपसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक महाले अधिक तपास करीत आहेत.
  दुचाकीचोरीची चौथी घटना डॉ. सांगळे हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये घडली आहे. भूषण हिरामण महाले (वय ३३, रा. पेठ रोड) यांची एमएच १५एए ५९२७ या क्रमांकाची दुचाकी पेठ रोडवरील डॉ. सांगळे हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार भोज अधिक तपास करीत आहेत.

  दुचाकी चोरीची पाचवी घटना मोरवाडी गावात घडली आहे. रामप्रसाद कोंडीबाराव धोत्रे (रा. मोरवाडी गाव) यांची एमएच १५डीवाय ६६५०या क्रमांकाची दुचाकी मोरवाडी गावातील संतोषी माता मंदिराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शेख अधिक तपास करीत आहेत.

  दुचाकीचोरीची सहावी घटना सेलेब्रिटा हॉटेलसमोर घडली आहे. दर्शन दलबहादूर गुरखा (वय ३६, रा. जयाबाई कॉलनी, म्हसोबा मंदिराजवळ, नाशिकरोड) यांची एमएच १५ एफके ०९०७या क्रमांकाची दुचाकी सेलेब्रिटा हॉटेलसमोरील आर. एस. फिटनेस क्लब, पासपोर्ट कार्यालयाजवळून चोरून नेली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार काझी अधिक तपास करीत आहेत.