कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन; सिडकाेत बंदला अल्प प्रतिसाद

शॉपिंग सेंटर, छत्रपती शिवाजी चौक ते स्टेट बँक चौक, त्रिमूर्ती चौक, पवन नगर येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही वेळ मुख्य चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली मात्र कार्यकर्त्यांची पाठ फिरल्यानंतर परत दुकाने उघडी करण्यात आली. यावेळी सिडकोतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक मात्र सुरळीत होती. कुठलीही अनुचित घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंबड पोलिसांच्या वतीने  सिडको परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    सिडको : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या महाराष्ट्र बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, छावा संघटना, यांच्यासह अनेक संघटना बंदमध्ये सामील झाल्या होत्या. या बंदला सिडको परिसरात अल्प प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले होते.

    चाेख पोलीस बंदाेबस्त
    शॉपिंग सेंटर, छत्रपती शिवाजी चौक ते स्टेट बँक चौक, त्रिमूर्ती चौक, पवन नगर येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही वेळ मुख्य चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली मात्र कार्यकर्त्यांची पाठ फिरल्यानंतर परत दुकाने उघडी करण्यात आली. यावेळी सिडकोतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक मात्र सुरळीत होती. कुठलीही अनुचित घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंबड पोलिसांच्या वतीने  सिडको परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

    कार्यकर्त्यांकडून आवाहन
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले या बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, मुख्तार शेख, मुकेश शेवाळे, रविंद्र शिंदे, रमेश विखरणकर, विशाल डोखे, अक्षय परदेशी, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, सुनील घुगे, राजू उशीर, संतोष घोडके, अरुण वाघ अादी पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी आवाहन केले. तसेच त्रिमूर्ती चौक ते पवननगर येथे माकपचे तानाजी जायभावे, छावा जिल्हा अध्यक्ष आशिष हिरे, काँग्रेसचे  विजय पाटील, कृष्णा काळे, प्रितम भामरे, दिनेश नरवडे, इम्रान अन्सारी, देवेंद्र देशपांडे, सचिन गायकवाड, नितेश निकम, सूरज चव्हाण, बादशाह खान आदि पदाधिकाऱ्यांनी बंदसाठी आवाहन केले