accident in kasara

मुंबई नाशिक महामार्गावरून अवैधरित्या गोमांस(illegal beef transport) घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात(car accident on mumbai nashik highway) झाला

  कसारा : मुंबई नाशिक महामार्गावरून अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात(car accident on mumbai nashik highway) झाला.ही घटना शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक मुंबई वाहिनीवर घडली.या अपघातात चालक इम्रान शेख व हमीद शेख जखमी झाले असून त्यांना खर्डी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून शहापुर येथील सय्यद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  नाशिकहून मुंबईच्या दिशेने एमएच १४ डिए ९०९६ क्रमांकाची टोयोटा इटोस गाडी जवळपास दीड टन गोमांसाची वाहतूक करून घेऊन होती.कसारा गाव हद्दीत येताच भरधाव वेगाने निघालेल्या कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जवळपास रस्ता सोडून ३० मीटर अंतरावर जाऊन नाशिक वाहिनीवर आदळली.त्यात कार पलटी होताच गाडीच्या डिकीमधून लहान वासरांचा गोमांस दुभाजकावर पसरले.अंदाजे १३ ते १५ किलो वजनाचे अंदाजे २० पारडू होते.

  या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इम्रान शेख याची प्रकृती चिंताजनक असून हमीद शेख याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.यातील एकजण फरार झाला असल्याचे घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले.यावेळी कसारा गावातील तरुण सद्दाम सारंग,नजीर शेख यांनी इतर तरुणांच्या मदतीने जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच कसारा प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक,उपनिरीक्षक सलमान खतीब,शहापुर महामार्ग पोलीस फौजदार गजेंद्र गुरव दाखल झाले.

  देवदूत बनून धावली डॉक्टर महिला 
  मुंबईहुन निघालेल्या डॉक्टर दर्शना तावडे यांनी अपघातातील जखमीला पाहताच गाडी रस्त्याच्याकडेला थांबवली.रस्त्यावर कोसळलेल्या व्यक्तीचा रक्तस्राव आणि त्याची तळमळ पाहता त्याच्या हृदयावर पंपिंग करून त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला.या डॉक्टर महिलेने माणुसकीचे दर्शन घडवून प्रामाणिकपणे कर्तव्याची पावती दिली आहे.त्यांच्या या प्रथोमोपचाराने जखमीला पुढील उपचार मिळण्याकरिता दिलासा मिळाला.

  संचारबंदी निर्बंध तोडून गोमांस वाहतूक 
  कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकोपाने सर्वत्र संचारबंदी लागू झाली असतानासुद्धा मुंबई नाशिक महामार्गावर गोमांस वाहतूक होत आहे.गोमांस घेऊन जाणाऱ्या चालकाने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली नाकाबंदी ठिकाणावरून पोलिसांना चकमा देऊन पळ काढला.मात्र अपघातातून गोमांसची वाहतूक होत असल्याची उघडकीस आले.सर्व व्यवहार बंद झाले असून कत्तलखाने सुरू कसे ? हा मुद्दा उपस्थित होत आहे.त्यात जिल्हा सीमा नाकाबंदी असताना अवैधरित्या गोमांसची तस्करी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.