Kanda-Utpadak-Shetkari-aandolan

लासलगांव : विदेश व्यापार महासंचालक अमित यादव नवी दिल्ली यांनी कृष्णापुरम आणि बेंगलोर रोझ या कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी देत असल्याची माहिती दिली आहे.आज अमित यादव यांनी या संदर्भात नोटिफिकेशन काढून प्रत्येकी १० हजार मॅट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे.

कृष्णा पुरम कांदा हा चवीने तिखट असल्याने याचा मोठ्या प्रमाणात उपयोग सांबर साठी वापर केला जातो तसेच औषधी गुणधर्म असल्याने या कांद्याला विदेशात चांगली मागणी असते. यामुळे १० हजार मैट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आंध्रप्रदेशातील कृष्णपुरंम कांद्याला थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूर मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे

नाशिक सह राज्यातील बाजार समिति मध्ये कांद्याची आवक कमी होत असल्याने सध्या कांदा भाव खात आहे.वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्राने ९ रोजी नोटिफिकेशन काढून कृष्णापुरम आणि बेंगलोर रोझ या कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी दिली आहे. विशिष्ट एका राज्यातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

बंगलोरचा गुलाबी कांदा आणि आंध्रप्रदेशच्या कृष्णपूरम कांदा निर्यातीला मंजूरी दिली असून चेन्नई पोर्ट वरून या कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यासाठी कांदा निर्यातदार यांना फलोत्पादन आयुक्त कर्नाटक यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे ३१ मार्च २०२१ पर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.

शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने संपूर्ण कांदा निर्यातीला परवानगी देणे गरजेचे होते मात्र फक्त दोन राज्याच्या कांद्याला परवानगी देऊन दुटप्पी भूमिका का घेत आहे ? केंद्र सरकारने शेतकऱ्या वरती केलेला हा भेदभाव असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे

-जयदत्त होळकर, संचालक मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती

“कांद्याच्या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसतांना निर्यात बंदी उठवणे गरजेचे होते मात्र फक्त एकच राज्याची निर्यातबंदी उठवून केंद्र सरकारचा दूटपी भूमिका का घेत आहे.”

-निवृत्ती न्याहारकर, शेतकरी वाहेगाव,साळ