BJP in search of new home; Chandrakant Patil's attempt to strangle MNS president Raj Thackeray

नाशिकमध्ये भाजप - मनसे युती होईल की नाही हे सांगणे माझा अधिकार नाही. आमची कोअर कमिटी असते या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर कोणता निर्णय घेतला जातो. पंरतु असे काही ठरले नाही. परस्पर काही करण्यासाठी मी प्रसिद्ध नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते नाशिक दौ-यावर असतांना भाजप - मनसेची महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा सुरु आहे.

    नाशिक : राज ठाकरे यांना नाशिकला भेटलो पाहिजे असे काही नाही, मी त्यांच्या घरी जाऊ शकतो इतके चांगले आमचे संबंध आहे. पण, त्यांच्या माझ्या वेळा जुळल्या तर इथे पण एक कप चहा त्यांच्यासोबत घेईन असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीच्या प्रश्नांवर उत्तर देतांना सांगितले.

    नाशिकमध्ये भाजप – मनसे युती होईल की नाही हे सांगणे माझा अधिकार नाही. आमची कोअर कमिटी असते या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर कोणता निर्णय घेतला जातो. पंरतु असे काही ठरले नाही. परस्पर काही करण्यासाठी मी प्रसिद्ध नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोन्ही नेते नाशिक दौ-यावर असतांना भाजप – मनसेची महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा सुरु आहे.

    राज ठाकरे व पाटील यांची भेट नाशिकमध्ये होणार असल्याचे बोलले जात होते. पण, या सर्व प्रश्नांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यावेळी त्यांनी खूप जणांच्या चौकशी सुरु आहेत. ज्या अटकेच्या दिशेने असल्याचे सांगितले.
    अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी लावा म्हणून काल कोणीतरी कोर्टात गेले आहेत नितिन राऊत प्रकरणीही कोर्टाने फटकारलय, राठोडचे पण एक मॅटर पेंडिंग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मी कोणालाही अटक होऊ शकते असे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी त्यांनी माझा रोख कोणावर नव्हता असेही सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुरबुरीवर बोट ठेवत सांगितले की, प्री मारतो तू लागल्यासारखं कर अस यांच सुरु आहे जनता निवडणुकीची वाट बघते आहे.२०२२ ला अनेक निवडणूका आहेत. हा सर्व गैम सुरु आहे. तीन पक्ष आहेत रोज सकाळी गेम तयार करतात आणि त्यात ठरते की आज कोणी काय गेम खेळायचा असेही सांगितले.