चांदवड : मुंबई येथून चोरलेल्या दोन चारचाकी वाहने मालेगावकडे घेऊन जात असलेल्या दोघा संशयिताना चांदवड पोलिसांनी मंगरूळ टोलवर सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, ठाणे मीरा भाईदर, वसई विरार आयुक्तालय ठाणे पोलीस स्टेशन मध्ये बोलेरो पिक अप गाडी (क्र. एम. एच. १८, टी. ८५७७) चोरीचा गुन्हा दाखल आहे. सोमवार (दि.७) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदर चोरीची गाडी मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव दिशेने जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. या माहितीनुसार चांदवडचे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, सहा. पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस नाईक मुज्जमील देशमुख, मंगेश डोंगरे, योगेश हेंबाडे, यांनी मंगरूळ टोलवर सापळा रचला. यावेळी मुंबईवरून चोरलेले पिक अप गाडी येताच गाडीचालक आवेस शेख रहीम शेख (२७, रा. आयदनगर, धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीचालकाची पोलिसांनी कसून तपासणी केली असता पिकअप चोरीची असल्याचे त्याने कबूल केले. ताब्यात घेतलेल्या गाडी चालक शेख याने पाठीमागून अजून एक गाडी येत असल्याचे सांगितले. यावेळी स्वीफ्ट डिझायर गाडी (क्र. गुजराथ ४ आर ३४३) चालक निशांत दीपक बोरसे (वय १९, चाळीसगाव चौफुली धुळे) यास ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांकडून चांदवड पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपयांची सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी व ३ लाख किंमत असलेली स्वीप्ट डिझायर गाडी, ओपो कंपनीचा १२ हजार व समसंग कंपनीचा १ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेत दोघांना अटक केली आहे.