चांदवड तालुका वीज कर्मचारी अधिकारी ; कृती समितीचा काम बंदचा इशारा

महावितरण कंपनीच्या चांदवडच्या उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना काळात जीवाची परवा न करता अखंडीत वीज पुरवठा केला आहे. कोरोना काळात वीजबिलांची वसुली देखील करण्यात आली नव्हती. यामुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. यासाठी राज्य शासनाने कृषी धोरण २०२० नुसार शेतकरी बांधवाना थकीत बिलावर दिलेली सूट या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहे.

    चांदवड: थकीत वीजबीलधारक शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा जोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात द्यावे, शिवाय जोपर्यंत थकीत वीजबिलांची वसुली होत नाही तोपर्यंत वीज पुरवठा जोडू नये तसेच वीजबिलांची वसुली करताना अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा चांदवड तालुका वीज कर्मचारी अधिकारी संयुक्तिक कृती समितीच्या वतीने पुढील काळात काम बंद करण्याचा इशारा चांदवडचे उपविभागीय कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

    निवेदनात म्हटलेनुसार, महावितरण कंपनीच्या चांदवडच्या उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना काळात जीवाची परवा न करता अखंडीत वीज पुरवठा केला आहे. कोरोना काळात वीजबिलांची वसुली देखील करण्यात आली नव्हती. यामुळे महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. यासाठी राज्य शासनाने कृषी धोरण २०२० नुसार शेतकरी बांधवाना थकीत बिलावर दिलेली सूट या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहे. तरीदेखील शेतकरी बांधव वीजबिल भरण्यास पुढे येत नसल्याने नाईलाजास्तव तालुक्यातील वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडित केल्याने काही शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करीत वीज पुरवठा जोडून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी चांदवडचे उपविभागीय कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी तोंडी आदेश देत खंडीत पुरवठा पुन्हा जोडून देण्याचे अधिकारी, कर्मचारी वर्गाला सांगितले होते. मात्र यास संघटनेने विरोध करीत लेखी स्वरूपाचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
    यावेळी संघटनेचे सचिव दीपक गांगुर्डे, सोमनाथ मापारी, अमोल काळे, बांगर, दीपक बच्छाव, सोदे, राहुल शिंदे, हिरामण शिंदे, सुभाष शिंदे, मनोज कुंभार्डे, गोरख आवारे, गोवर्धन शिंदे, अविनाश वरे, प्रवीण कोल्हे, नंदू पठाडे, महेश पवार, योगेश वाघ, अनिल कुंभार्डे, मनोज पेंढारी, राकेश ढगे, कृष्णा कुंभार्डे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.