स्मार्ट रोडसाठी वाहतुकीत बदल

मॅरेथॉन चौक ते केकान रुग्णालयापर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्मार्ट रोड तयार करण्यात येत आहे.

नाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान रुग्णालयापर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्मार्ट रोड तयार करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढली आहे.

पहिल्या टप्प्यात मॅरेथॉन चौक ते लोकमान्यनगर आणि दुसऱ्या टप्प्यात लोकमान्य नगर ते केकान रुग्णालय असे रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मॅरेथॉन चौकाकडून केकान रुग्णालयापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, केकान रुग्णालय, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका सिग्नलमार्गे वाहतूक गंगापूर रोडने इतरत्र वळवण्यात आली आहे.