वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, छगन भुजबळांचा भाजपला इशारा

कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी भाजपला दिला आहे

    गेल्या काही दिवसांत शिवसेना भाजपविरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का, असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. तेव्हा भुजबळ यांनी म्हटले की, राज्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावचं लागतं. मात्र, वाघ कधीही पंजा मारू शकतो, असे भुजबळ यांनी सांगितले.

    कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी भाजपला दिला आहे. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर भेटीसंदर्भातही भाष्य केले.

    प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यामुळे अनेक राजकीय पक्षांना यश मिळाले आहे. निवडणूक व्यवस्थापनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी काही सल्ला दिला तर पवारसाहेब नक्कीच ऐकतील, असे भुजबळ यांनी म्हटले.