Chhagan Bhujbal's appeal to the citizens is that if the rules are followed, another deadly wave of corona infection is inevitable

आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करुन फिरलात तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून कोणीही वाचवू शकणार नाही.

नाशिक : जगातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने  ( deadly wave of corona) हाहाकार घातला आहे. भारतात कोरोना परिस्थिती आटोक्यातच आसली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट अजूनही गेले नाही. कोरोनाची लागण (corona infection) आपल्या होऊन ये तसेच कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. काहीजण अजूनही कोरोनाच्या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. अनेकजण मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. अन्य देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परंतु आपल्याकडे जणू कोरोना संपल्यासारखे समजून फिरत आहेत. असे मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.

आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करुन फिरलात तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून कोणीही वाचवू शकणार नाही. ही कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरेल अशी जाणीवही मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

इतर देशात कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी आणि अतिभयंकर ठरत आहे. आपल्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. परंतु हि आटोक्यात आलेली परिस्थिती कायम राखण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवत आहे. तसेच कोरोना रुग्णांचा तातडीने उपचार करुन बरे करण्याचे काळजी प्रशासन घेत आहे.

नाशिक जिल्ह्यात मागील महिन्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ही २८०० होती. तीच संख्या आता ३५०० रुग्णांवर पोहोचली आहे. त्यामुळे अवघ्या १ महिन्याच्या कालावधीत ७०० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यावरुन असे दिसते आहे की, कोरोना संसर्ग पुन्हा हात पाय पसरत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे संरक्षण केले पाहिजे. असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.