‘नाशिकच्या विकासात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा’ – जयंत पाटील

नाशिकच्या विकासात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. शहरात उड्डाणपुलाची व्यवस्था करून ट्रॅफिकचा प्रश्न भुजबळांनी सोडवून दाखवला. त्यामुळे पक्षाला नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागा मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. भविष्यात भुजबळांच्या नेतृत्वाखाली रखडलेली विकास कामे पूर्ण करून दाखवू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या परिवार संवाद यात्रेच्या तिसऱ्या पर्वाचा नाशिक शहरात समारोप झाला. या दौऱ्यातून जयंत पाटील यांनी नाशिक शहर कार्यकारिणी व विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सभेला संबोधित केले व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.

    यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बुथ कमिटी हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बुथ कमिटी सक्षम करण्याकडे प्रत्यकाने भर द्यायला हवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. नाशिकच्या विकासात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. शहरात उड्डाणपुलाची व्यवस्था करून ट्रॅफिकचा प्रश्न भुजबळांनी सोडवून दाखवला. त्यामुळे पक्षाला नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागा मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. भविष्यात भुजबळांच्या नेतृत्वाखाली रखडलेली विकास कामे पूर्ण करून दाखवू हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भुजबळांना आणि त्यांच्या परिवाराला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. त्यांना तब्बल २७ महिने तुरुंगवास भोगावा लागला. मात्र विजय नेहमी सत्याचाच होतो. त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली आहे ही जमेची बाजू जयंत पाटील यांनी यावेळी मांडली.

    देशात वाढत्या महागाईने सामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. मागील ७५ वर्षात कमावलेल्या गोष्टी मागील पाच वर्षात विकण्याचे काम देशात सुरू आहे. दोन व्यक्ती विकत आहेत दोन व्यक्ती खरेदी करत आहेत. आपल्याला या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहचवून भाजपाला सत्तेतून खाली आणायचे आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे या पक्षात प्रत्येक वर्गाला समान वागणूक दिली जाते. अशा शरद पवार साहेबांच्या पक्षाला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.