छत्रपती सेनेचा पुढाकार ; “झाडे लावा ऑक्सिजन वाढवा” उपक्रमांतर्गत वृक्षलागवड

छत्रपती सेनेची झाडे लावा अाॅिक्सजन वाढवा या मोहिमेत राज्यात ५१०० झाडांची लागवड करण्याचे लक्ष्य आहे. ज्यात वड, पिंपळ, कडुलिंब, अडुळसा, कापूर, उंबर, जांभूळ, सीताफळ, आंबा इत्यादींचा समावेश आहे. ज्या नागरिकांनी कोरोना काळात आपल्या नातेवाईकांना ऑक्सीजन आभावी गमवावे लागले त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली म्हणून १ वृक्ष लावावे.

    जुने नाशिक : सातारा येथील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान जलमंदिर पॅलेस येथुन सुरुवात झालेल्या झाडे लावा अाॅिक्सजन वाढवा छत्रपती सेनेची या मोहिमेंतर्गत पांडवलेणी येथील हजरत सैय्यद मलिक शाह हुसैनी बाबा यांच्या दर्गा शरीफजवळ फळ झाडांची लागवड करण्यात आली.

    यांची  उपस्थिती
    याप्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, मुस्लिम आघाडी प्रमुख असलम लालू, जिल्हाप्रमुख युनूस पठाण, शहर अध्यक्ष आसिफ शेख, सिडको प्रमुख झाकीर पठाण, पाथर्डी प्रमुख कलिम मुलानी, अ‍ॅड. जावेद शेख, मुस्ताक लालू, आरिफ शेख, धीरज खोळंबे, राज गुंजाळ आदी उपस्थित होते. दरम्यान म्हसरुळ परिसरात देखील वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी छत्रपती सेना विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष रितेश आहेर, केतन साबळे, सिद्धांत तिसगे, ऋषिकेश खरे आदी छत्रपती सैनिक उपस्थीत होते.

    या झाडांची लागवड
    छत्रपती सेनेची झाडे लावा अाॅिक्सजन वाढवा या मोहिमेत राज्यात ५१०० झाडांची लागवड करण्याचे लक्ष्य आहे. ज्यात वड, पिंपळ, कडुलिंब, अडुळसा, कापूर, उंबर, जांभूळ, सीताफळ, आंबा इत्यादींचा समावेश आहे. ज्या नागरिकांनी कोरोना काळात आपल्या नातेवाईकांना ऑक्सीजन आभावी गमवावे लागले त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली म्हणून १ वृक्ष लावावे. प्रत्येक पदाधिकारीने २१ वृक्ष लागवड करण्याची जबाबदारी घेतली आहे. ऑक्सीजन आभावी कोरोना काळात बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला याची दाखल घेत संघटनेमार्फत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती छत्रपती सेना विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रितेश आहेर यांनी दिली.