ओझर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात ते लसीकरण व पोषण पुनर्वसन केंद्राची पाहणी करणार अाहेत, त्यानंतर सुरवाणी, धडगाव येथील महापारेषणकडून बांधण्यात येत असलेल्या विद्युत उपकेंद्राची पाहणी करतील, दुपारी धडगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी त्यानंतर अाढावा बैठकही घेण्यात येणार अाहे.

    नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांचे पुष्प देऊन स्वागत केले.
    मुखमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. तसेच यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे यांचे पुष्प देवून स्वागत केले. यानंतर मुख्यंमत्र्यांनी ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरने नंदुरबारकडे प्रयाण केले.