मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पत्र ; खासगी रुग्णालयांचा काेविड सेंटर बंद करण्याचा निर्णय

काेराेना काळात खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या देयकांवरून आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी ऑपरेशन हाॅसि्पटल अभियान सुरू केले हाेते. याअंतर्गत त्यांनी खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या जादा देयकांबाबत जाब विचारून अनेक रुग्णांचे काेट्यवधी रुपये वाचवले हाेते.

  नाशिक : गेल्या दीड वर्षांपासून आम्ही काेराेेनाबाधितांच्या सेवेत आहाेत. गेल्या काही दिवसांत काेराेनाबाधितांची संख्या माेेठ्या प्रमाणात वाढल्याने आमच्यासह कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण हाेता. आता रुग्णसंख्या कमी झाली असून, शासकीय यंत्रणा हे रुग्ण सांभाळण्यास सक्षम असल्याचे सांगत आम्ही काेविड रुग्णालये बंद करत असल्याचे पत्र हाॅसि्पटल ओनर्स असाेिसएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना पाठवले आहे. या यादीत १७२ रुग्णालयांचा समावेश आहे.

  काेराेना स्थिती आटोक्यात

  शासन नियमांचे काटेकाेर पालन करत काेराेनाची साथ आटाेक्यात आणण्यासाठी आम्ही रुग्णांची सेवा केली. मृत्यूदर कमी राखण्यात आणि रुग्ण बरे करण्यात आमचा सर्वांचाच याेगदान आहे, हे आपणही मान्य करतात. परंतु आता सि्थती आटाेक्यात आल्याने आम्ही आमचे काेविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेत आहाेत, असेही या पत्रात म्हटले आहे.

  चाैकशी समिती

  काेराेना काळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारल्याप्रकरणी खासगी रुग्णालये चाैकशीच्या फेऱ्यात अडकू लागली आहेत. काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट केल्याचे आराेप सातत्याने हाेेत हाेते. महासभेनेदेखील मानवता क्युरिच्या चाैकशीसाठी समिती नेमली आहे.

  ऑपरेशन हाॅस्पिटल

  काेराेना काळात खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या देयकांवरून आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी ऑपरेशन हाॅसि्पटल अभियान सुरू केले हाेते. याअंतर्गत त्यांनी खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या जादा देयकांबाबत जाब विचारून अनेक रुग्णांचे काेट्यवधी रुपये वाचवले हाेते.

  वाेक्हार्टमधील वाद

  ऑपरेशन हाॅसि्पटलचे जितेंद्र भावे यांनी वाेक्हार्ट रुग्णालयाने रुग्णाकडून घेतलेले डिपाॅझिट परत केले नाही म्हणून अर्धनग्न हाेऊन आंदाेलन केले हाेते. हे आंदाेलन राज्यभर गाजले. यानंतर आराेेग्यमंत्री राजेश टाेपे यांनीदेखील खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाची चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

  चाैकशीचा ससेमिरा

  नाशिक महापािलकेच्या काल झालेल्या महासभेत राेशन घाटे मृत्यूप्रकरणी मानवता क्युरी रुग्णालयाच्या चाैकशीसाठी दाेन सदस्यीय समितीची महापाैरांनी घाेषणा केली हाेती. ही समिती या सर्व प्रकरणाची चाैकशी करून अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्यामागे चाैकशीचा ससेमिरा लागला आहे.