गायकर कुटूंबांचे सांत्वन : जीवन-मरणाची लढाई आधी मग हक्काची : संभाजीराजे भोसले

नाशिक जिल्ह्यातील आजचा दौरा कुठलाही राजकीय दृष्ट्या नसून गायकर कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलो आहे. त्यांच्या आयुष्यातील पडलेली ही पोकळी भरून काढण्यासाठी नेहमीच त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा राहून कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल.

  नाशिक :आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणासंदर्भातील भावनांशी मी सहमत आहे. ज्या भावना समाजाच्या त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटीबध्द आहेच. तथापि आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत. आपण प्रत्येकाने आपला जवळचा कुणीतरी गमावला आहे. जीवन मरणाची ही लढाई जिंकणे हे आपले या क्षणाचे पहिले काम आहे. माणसं जगली तर मिळालेले आरक्षण सार्थ ठरेल. ही लढाई जिंकल्यानंतर आरक्षणासाठी मी स्वतः समाजासोबत रस्त्यावर उतरेल, असे प्रतिपादन खा. संभाजी राजे भोसले यांनी केले.

  आरक्षणाबाबत भूमिका
  सध्याच्या परिस्थितीत कुठलेही आंदाेलन हे सामूिहक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल, असा इशारा दिला. छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या वडीलांचे निधन झाल्यानंतर गायकर कुटूंबांचे सांत्वन करण्यासाठी छञपती संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर आले होते. तेव्हा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  सर्वांच्या पाठिशी उभे राहणार
  नाशिक जिल्ह्यातील आजचा दौरा कुठलाही राजकीय दृष्ट्या नसून गायकर कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलो आहे. त्यांच्या आयुष्यातील पडलेली ही पोकळी भरून काढण्यासाठी नेहमीच त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभा राहून कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर शिवा तेलंग यांच्या मातोश्री, ज्ञानेश्वर थोरात यांचे भाऊ, मराठा क्रांती मोर्चाचे निलेश गायके, सामाजिक कार्यकर्ते रोशन घाटे यांचेही दुःखद निधन या काळात झाले. त्यांच्याही कुटुंबांसोबत मी सदैव पाठीराखा म्हणून उभा राहील, असेही ते यावेळी म्हणाले.

  रुग्णवाहिकेचे लाेेकार्पण
  यावेळी खा. संभाजी राजे भोसले रूग्णवाहिकेचे लाेेकार्पण तुषार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. शिवतीर्थ प्रतिष्ठानतर्फे रूग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. खा. भाेसले यांच्या हस्ते हे लोकार्पण निश्चित होते. तथािप त्यांनी हे लोकार्पण करण्याचा मान आरोग्यदूत तुषार जगताप यांना दिला. गेली दहा-पंधरा वर्षांपासून तुषार जगताप समाजाच्या आरोग्यासाठी काम करीत आहेत. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अाॅिक्सजनचा तुटवडा भासत असल्याने श्वास कोंडलेल्या अत्यवस्थ रूग्णांसाठी युवराज संभाजी राजे छञपती वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अाॅिक्सजन सिलेंडर निःशुल्क उपलब्ध करून देत शेकडो रूग्णांचे प्राण वाचवले. म्हणून रूग्णवाहिका या जीवन वाहिनीचे लोकार्पणही या आरोग्य दुताच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून तुषार जगताप यांना सुखद धक्का दिला.

  यांची उपस्थिती
  यावेळी कुटुंबियांसमवेत विलास पांगरकर, प्रमोद जाधव, तुषार जगताप, नगरसेवक योगेश शेवरे, विक्रम नागरे, बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रितेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, निलेश शेजुळ, सोनू काळे, अविनाश गोसावी उपस्थित होते.

  छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेऊन रयतेच्या भावना जपणारा राजा खरा लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखला जातो. आज रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्याची राजेंनी मला दिलेली संधी ही माझ्यासारख्या सामान्य मावळ्याच्या पाठीवर राजाने मारलेली अविस्मरणीय थाप आहे. या शाबासकीतून प्रेरणा घेत सामाजिक काम सातत्याने सुरू राहील.

  - तुषार जगताप, आरोग्यदूत नाशिक