वर्षपूर्ती झाली; आता सात-बारा काेरा करा ; भाजपा किसान माेर्चाचे निवेदन

सटाणा : आघाडी सरकारने निवडणूक कालावधीत सत्तेत आल्यावर तीन महिन्यात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी दिले होते. आघाडी सरकारला एक वर्षपुर्ती होऊन देखील सातबारा कोरा न झाल्याने शासनाने शेतकर्‍यांचा सातबारा सरकट कोरा करण्यात यावा या मागणीचे निवेदन बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना बागलाण भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे वतीने देण्यात आले आहे.

-शेतकरी आर्थिक संकटात
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारने निवडणूक कालावधीत सत्तेत आल्यावर तीन महिन्यात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी दिले होते. आघाडी सरकारला एक वर्षपुर्ती होऊन देखील सातबारा कोरा न झाल्याने शासनाने शेतकर्‍यांचा सातबारा सरकट कोरा करण्यात यावा. काेराेनाच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

-अवकाळीने झाेडपले
अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तसेच कांद्याचे बी चढया भावाने घेऊन कांदा लागण केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे लागवड केले कांद्याचे रोपे पुर्णतः नाश झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने शासनाने एक हजार रूपये प्रती क्विंटल अनुदान देऊन तात्काळ निर्यात खुली करावी. शेतकर्‍यांना पिकांसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बिंदू शर्मा, सुधाकर पाटील, दगडू बोरसे, पंडीत देवरे, लक्ष्मण गोयकर, देविदास वनीस, निर्माला आहेर, सुशिलाबाई कापडणीस, किशोर सोनवणे, बाळसाहेब बिरारी, नंदकिशोर अहिरे आदी उपस्थित होते.