आराेग्य सेवकांना सहकार्य करा : डाॅ.पंकज राणे

प्राणायाम करा, तासातून पंधरा मिनिटे तरी पालथे झाेपा, त्यामुळे फुफ्फुसातील त्रास कमी हाेऊन आपली अाॅिक्सजन पातळी चांगली राहील, आपली अाॅिक्सजन पातळी खालावणार नाही. ही गाेेष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली तर आपण हाेम आयसाेलेशनमध्येही ठिक हाेऊ शकाल.

  नाशिक : काेराेना हे अचानक आलेले संकट आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्र असाे अथवा शासन काेणीही पूर्वतयारीत नव्हते. त्यामुळे काेराेनाबाधितांची संख्या वाढल्याने अडचणी येत आहेत. पण या अडचणींवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक जण जीवाचे रान करून लढताे आहे. या लढाईत रुग्णांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनीदेखील साथ देणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रालाही मर्यादा आहेत, हे सर्वांनीच समजून घेतले पािहजे. सद्यसि्थतीत आराेग्यसेवकांना सहकार्य करणे, गरजेचे असल्याचे मत नारायणी हाॅसि्पटलचे संचालक डाॅ. पंकज राणे यांनी व्यक्त केले.

  घाबरून जाऊ नका
  काेराेनाची काेणतीही लक्षणे दिसत असली तर प्रथम चाचणी करून घ्या. चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला तर आपल्या जवळच्या डाॅक्टरांशी संपर्क साधून याेग्य ते मार्गदर्शन घेऊन उपचार सुरू करा. ज्यांना श्वासाचा त्रास माेठ्या प्रमाणात हाेेताे; त्याच रुग्णांना रुग्णालयात दाखल हाेणे गरजेचे आहे. अन्य रुग्ण हे घरी राहूनही बरे हाेऊ शकतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल हाेण्याचा आग्रह न धरता ज्यांना खराेखर रुग्णालयात दाखल हाेण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्यास मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

  सीटी स्कॅनची घाई नकाे
  सीटी स्कॅन हा लक्षण दिसल्यानंतर सातव्या दिवशी केल्यास त्याचा आपल्याला चांगला उपयाेग हाेेताे. आता रुग्ण येतानाच सीटी स्कॅनचा रिपाेर्ट घेऊन येतात. प्रत्यक्षात या रिपाेर्टचा फारसा उपयाेग नाही. सात दिवसांनंतर प्रत्यक्षात किती इन्फेक्शन आहे, हे प्रत्यक्षात लक्षात येते. रुग्णांनी पहिल्याच दिवशी सीटी स्कॅन करणे टाळले, तर प्रत्यक्षात ज्या रुग्णाला याची गरज आहे, त्याला चार-पाच तास वाट पहावी लागणार नाही. हेही नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे. डाॅक्टरांनी सीटी स्कॅन करायला सांगितला तरच रुग्णाने सीटी स्कॅन करावा. रुग्णाच्या आराेग्याच्या परिसि्थतीवर सीटी स्कॅनचा स्काेअर किती आहे? आणि त्याचा रुग्णाला काय त्रास हाेऊ शकताे, हे अवलंबून असते. त्यामुळे सीटी स्कॅनचा स्काेअर जास्त असला आणि  रुग्णाला काही समस्या नसेल तर त्याला घरी पाठवता येऊ शकते.

  हाेमआयसाेलशन असलेेल्यांची जबाबदारी
  ज्यांना जास्त त्रास नाही त्यांना हाेम आयसाेलेशनमध्ये ठेवले जाते. मात्र हे रुग्ण आपल्याला काही त्रास नाही म्हणून बाहेर फिरतात आणि हेच सुपर स्प्रेडर हाेत आहेत. त्यांना त्रास हाेत नसला तरी ते दुसऱ्यांना गंभीर त्रास करू शकतात, हे लक्षात घेऊन त्यांनी हाेम अायसाेलेशनचे नियम पाळणे गरजेचे आहे. परस्पर गाेळ्या अाैषधे न घेता डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच अाैषधे घ्याव्यात, म्हणजे त्रास वाढणार नाही.

  हे व्यायाम करा
  प्राणायाम करा, तासातून पंधरा मिनिटे तरी पालथे झाेपा, त्यामुळे फुफ्फुसातील त्रास कमी हाेऊन आपली अाॅिक्सजन पातळी चांगली राहील, आपली अाॅिक्सजन पातळी खालावणार नाही. ही गाेेष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली तर आपण हाेम आयसाेलेशनमध्येही ठिक हाेऊ शकाल.

  रेमडिसिवर लाईफ सेव्हर नाही
  रेमडिसिवर हे काही अद‌्भूत अाैषध नाही. आतापर्यंत रेमडिसिवरची गरज फक्त अाॅिक्सजनची पातळी कमी झाली असेल तरच त्याचा काही प्रमाणात उपयाेग हाेेताे. रेमडिसिवरमुळे मृत्यू दर कमी झाला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. डब्ल्यूएचअाेनेदेखील रेमडिसिवर वापरू नये, असे सूचविले आहे. रेमडिसिवरचा उपयाेग पहिल्या सात दिवसांत वापरले तरच उपयाेग हाेताे. रेमडिसिवरचा तुटवडा असताना रुग्ण सहा इंजेक्शन घेऊन येतात आणि आम्हाला दाखल करून घ्या आणि आम्हाला इंजेक्शन द्या, असा आग्रह रुग्णांसह नातेवाईकांकडून धरला जात आहे. मात्र त्याची आवश्यकता आहे की नाही, हे डाॅक्टरला ठरवू द्या. सहा इंजेक्शनचा काेर्स झाला तरच उपयाेग हाेताे, असे काही नाही. तीन इंजेक्शन घेऊनही रुग्णाला बरे हाेता येते, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे.

  डाॅक्टरांवर िवश्वास ठेवा
  ज्या रुग्णालयात आपण दाखल झालाे आहाेत, त्या डाॅक्टरांवर िवश्वास ठेवा. आजच्या परिसि्थतीत अाॅिक्सजन अािण अाैषधांसाठी काय करावे लागते, हे फक्त डाॅक्टरांनाच मािहती अाहे. केवळ रुग्णांना त्रास हाेऊ नये म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक जण प्रयत्न करताे अाहे. अापापल्या परिने ते जास्तीत जास्त सुिवधा देण्याचा प्रयत्न करत अाहेत. त्यामुळे एखादी घटना घडली म्हणून त्या डाॅक्टरला दाेष देणे िकंवा रुग्णालयाची ताेडफाेड करणे याेग्य नाही. रुग्ण अाणि नातेवाईकांनी समजूतदारपणा दाखवून अाजच्या परिसि्थतीशी लढण्यासाठी डाॅक्टरांना बळ देणे गरजेचे आहे.