marathi sahitya

कोरोनाच संसर्ग रोखण्यासाठी सर्व राजकीय कार्यक्रम आणि सभा आणि मोर्चांना सरकारनं मनाई केलीय. मात्र साहित्य संमेलनाच्या बाबतीत हे आदेश लागू होतात की नाही, असा सवाल उपस्थित होतोय. साहित्य संमेलन हा पूर्वनियोजित कार्यक्रम असून तो रद्द केला जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. संमेलनाच्या आयोजनाचं सर्व नियोजन पूर्ण झालं असून आतापर्यंत तरी त्यात काही बदल असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. 

    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून नागरिकांनी काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा कालच (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलाय. कोरोनाबाबतच्या सर्व निकषांचं पालन करत गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन होणार की नाही, असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडलाय.

    कोरोनाच संसर्ग रोखण्यासाठी सर्व राजकीय कार्यक्रम आणि सभा आणि मोर्चांना सरकारनं मनाई केलीय. मात्र साहित्य संमेलनाच्या बाबतीत हे आदेश लागू होतात की नाही, असा सवाल उपस्थित होतोय. साहित्य संमेलन हा पूर्वनियोजित कार्यक्रम असून तो रद्द केला जाणार नाही, अशी माहिती मिळत आहे. संमेलनाच्या आयोजनाचं सर्व नियोजन पूर्ण झालं असून आतापर्यंत तरी त्यात काही बदल असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही.

    कोरोनाचं संकट वाढत असलं तरी सर्व खबरदारी घेऊनच साहित्य संमेलन पार पडेल, अशी ग्वाही नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच दिली होती. २६ मार्च ते २८ मार्च या कालावधीत हे संमेलन पार पडणार आहेत. या संमेलनाचा अजून एका महिन्यापेक्षाही अधिक कालावधी आहे. तोपर्यंत कोरोनाची महाराष्ट्रातील आणि नाशिकमधील परिस्थिती कशी बदलते, यावर संमेलनाचं भवितव्य ठरेल, असंही सांगितलं जातंय.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून साहित्यप्रेमी हजेरी लावत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर अगोदरच सर्व निकषांचं पालन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याचं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे संमेलनाला जाण्याच्या तयारीत असणाऱ्या साहित्यप्रेमींना सध्या नियोजन करावं की कोरोनाची परिस्थिती पाहून आयत्या वेळी निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.