मालेगावच्या कोरोना बधिताचा अकोल्यात मृत्यू

मालेगाव,
शहरातील कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीचा अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान शुक्रवार,१० जुलै रोजी सकाळी मृत्यू झाला.

मालेगाव येथील अकोला फाटा परिसरातील प्रभाग 16 मधील रहिवाशी असलेल्या ह्या व्यक्तीचा मंगळवार,30 जून रोजी कोरोना तपासणी अहवाल बाधित असल्याचा आला होता. या बाधित व्यक्तीवर अकोला येथे उपचार सुरु होता.मात्र, शुक्रवार 10 जूलै रोजी बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.मालेगाव येथे बधितांच्या निधनची वार्ता कळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालेगाव शहरातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे.
 
 
नगर पंचायत प्रशासन आणि नागरिकांनी किमान आतातरी कोरोना निर्बधाचे काटेकोर पालन करावे अशी अपेक्षा सामान्यजन व्यक्त करीत आहेत