मुंबईतून आलेल्या १६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या नाशिकला मोठा धक्का

कोरोनाच्या संकटकाळातही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरीकांची सेवा करत आहेत. एस टी महामंडळाच्या येवला आगारातील १६ वाहक चालकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत सेवा बजावत असताना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. यामुळे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या नाशिकला मोठा धक्का बसला आहे.

नाशिक : कोरोनाच्या (corona) संकटकाळातही एसटी कर्मचारी (st bus workers) आपला जीव धोक्यात घालून नागरीकांची सेवा करत आहेत. एस टी महामंडळाच्या येवला आगारातील १६ वाहक चालकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत सेवा बजावत असताना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. यामुळे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या नाशिकला (nashik) मोठा धक्का बसला आहे.

या सर्वांची कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली. या कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना बाभूळगाव आणि नगरसुल येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे आगारप्रमुखांनी सांगीतले.

मुंबईमध्ये लोकल सेवा बंद असल्याने त्याचा ताण बेस्टच्या वाहतूक सेवेवर पडत आहे. यामुळे एसटी महामंडळ बेस्टच्या मदतीला धावून आले आहे. मुंबईतील प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या येवला आगारातील ४४ कर्मचारी मुंबईत बेस्ट सेवेत तात्पुरत्या स्वरूपात रुजू झाले होते.

मुंबईत आपली सेवा बजावल्यानंतर हे कर्मचारी येवला येथे परतले. मुंबईतुन आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यापैकी १६ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगारातील कर्मचाऱ्यांना बेस्टला सेवा देण्यासाठी मुंबईत जावे लागले होते. मात्र, यातील फक्त येवला आगारातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला असल्याची माहिती येवला आगारातर्फे देण्यात आली.

या १६ कर्मचाऱ्यांच्या अहवालामुळे येवला तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १०२५ इतकी झाली असून त्यापैकी ९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, ५० जणांचा मृत्यू झाला आहे. येवला तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असतांनाच १६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुकावासियांसाठी हा धक्का मानला जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनतेने नियमांचे पालन करून दिवाळीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.