सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

जिल्ह्यामध्ये करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबरमध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो आकडा 1 हजारपर्यंत खाली आला असताना गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा 1544 वर पोहोचलेला आहे.

    नाशिक (Nashik).  जिल्ह्यामध्ये करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबरमध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो आकडा 1 हजारपर्यंत खाली आला असताना गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा 1544 वर पोहोचलेला आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

    ते म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढ होत राहिली तर मागील वर्षाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.  गेल्या वर्षी 28 मार्च रोजी आपल्याकडे फक्त 1 करोनोचा रुग्ण होता आणि त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होते पण आज आपल्याकडे पंधराशे रुग्ण आहेत. अशावेळेला आपण पंधराशे पट काळजी घ्यायला हवी. मास्क लावा आणि लॉकडाऊन टाळागेल्या वर्षभरापासून आपण सर्व  कोरोनाशी लढा देत आहोत.
    गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आपल्याला थोडी आशा निर्माण झाली होती की, आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू; परंतु आज परिस्थिती बदलत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे. त्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर हा सुरक्षा कवच म्हणून केला पाहिजे. तसेच याबरोबर सुरक्षित अंतर व सॅनिटायर्झचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

    थेट सहभाग टाळा, सोशल मिडीयाद्वारे सहभागी व्हाकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमात थेट सहभागी होण्यापेक्षा सोशल मिडीयाद्वारे संबंधित कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे केल्याने कोरोनाचा संसर्ग तर रोखता येईलच याशिवाय आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो. तसेच जेथे आपली उपस्थिती अनिवार्य असेलच अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही , जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.