
नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकाद कोरोनाचा धोका वाढला आहे. नाशिक मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोरोनाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. या प्रशिक्षण केंद्रात १७० जणांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन देखील हादरलं आहे.
नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Maharashtra Police Academy, Nashik) १७० जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नाशिक जिल्हा तसेच महानगरपालिका प्रशासन अलर्ट झाले आहे.
नाशिकच्या या पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात कोरोना चाचणी घेण्यात आली. यावेळी १७० जणांचे कोरोनो रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यात पोलीस प्रशिक्षणार्थी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांना उपचारासाठी नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.